उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीस धमकी दिल्या प्रकरणात तरुणी ताब्यात

 मुंबई– राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी देत सुमारे एक कोटी रुपयांची मागणी केल्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी उल्हासनगर शहरातून एका तरुणीस ताब्यात घेतले आहे. दरम्यान सदर तरुणी वादग्रस्त बुक्की अनिल जयसिंगाने यांची मुलगी असल्याची माहिती मिळत आहे.

अमृता फडणवीस यांना एक कोटी लाचेची मागणी करून त्यांना धमकावण्यात आले होते. याबाबत अमृता फडवणीस यांनी मलबार हील पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली होती.