छायाचित्र गुगलवरून साभार
🔶 तिरंगा फडकावून केला आनंद साजरा
मुंबई- हैदराबाद -दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते आणि सुपरस्टार ‘अजित कुमार यांचा डबल धमाका.’ ९९१ श्रेणीत तिसरे स्थान आणि GT4 श्रेणीत स्पिरिट ऑफ द रेस. ब्रेक फेल झाल्यामुळे झालेल्या अपघातानंतर अजितकुमार यांनी पुनरागमन धमाकेदार केले. चित्रपट अभिनेते सुपरस्टार अजित कुमार ‘दुबई २४ एच’ या शर्यतीत विजय मिळवत देशाची मान उंचावली आहे. दक्षिणेकडील सुपरस्टार अजित कुमार अलीकडेच रेसिंगमध्ये परतले आहेत. त्यांनी २४ एच दुबई २०२५ एंड्युरन्स रेसमध्ये भाग घेतला होता. त्यांच्या टीमने सांगितले की अजित कुमार रेसिंगमध्ये विजय मिळवला आणि नंतर भारतीय ध्वज फडकावून आपला विजय साजरा केला. या विजयाने निश्चितच भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. या स्पर्धेत अजित कुमार रेसिंग नावाची स्वतःची टीम देखील आहे.
दरम्यान या स्पर्धेच्या तयारीसाठी सरावादरम्यान अजित यांच्या कारचा भयंकर अपघात झाला होता. त्यांच्या रेसिंग कारचा चक्काचूर झाला होता. पण, त्यांचे मनोबल ढासळले नाही. मरणाच्या दारातून परत येत अजित कुमार यांनी प्रतिष्ठित स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले आहे. दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीत त्यांच्या दिमाखदार विजयानंतर सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता आर. माधवन यांच्यासह अनेकांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.
या चित्रपट अभिनेत्याचे रेस मधील थरारक अनेक व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. सुपरस्टार अजित कुमार यांचे अनेक हिंदी भाषेत डब करण्यात आलेले चित्रपट महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.
