🔷 भारतीय नौदल सामर्थ्यात वाढ
मुंबई– पंतप्रधान मोदी यांचा आज मुंबई दौरा असून या दौऱ्यामध्ये ते मुंबई नौदल गोदी मध्ये तीन युद्धनौकाचे राष्ट्रापर्ण करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार, १५ जानेवारी रोजी मुंबईत येत आहेत.
या वेळी युद्ध नौकांचा राष्ट्रापर्ण सोहळा मुंबई नौदलाच्या गोदीत सकाळी १० :३० सुमारास होतो आहे. यावेळी आयएनएस सुरत, आयएनएस वाघशीर-(पाणबुडी), आयएनएस निलगिरी, या युद्धनौकाचे राष्ट्रापर्ण होईल . नौदल गोदी येथील या सोहळ्यानंतर पंतप्रधान महाराष्ट्रातील मंत्री व महायुतीच्या निवडक आमदारांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान दुपारी ३ च्या नंतर मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

