🔶 राष्ट्रसंत भगवानबाबा सार्वजनिक पुण्यतिथी
बीड/परळी -वैजनाथ प्रतिनिधी- शहरातील टी.पी.एस. कॉलनीत ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवानबाबा महाराज सार्वजनिक पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी मीराबाई संस्थांच्या मठाधिपती ह.भ.प महंत आईसाहेब राधाताई महाराज सानप पाटोदा यांची कीर्तन सेवा झाली.
सकाळी 9 वाजता श्री संत भगवान बाबा प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी परळी आणि पंचक्रोशीतील भावी फक्त मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. टी.पी.एस कॉलनी परिसरातील श्रीराम मंदिर येथे या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यतिथी सोहळ्याच्या आयोजन, श्री संत भगवान बाबा सेवा मंडळ टीपीएस कॉलनी यांनी केले.
ह.भ.प महंत आईसाहेब राधाताई महाराज सानप यांनी आपल्या किर्तन परत सेवेमध्ये घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रचलेला चार चरणांचा आहे. किर्तन प्रसवे मध्ये
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एकढे कृपादान तुमचे मज सादर केला.
कार्यक्रमास परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे उपमुख्य अभियंता महेश महाजन, प्रभारी उपमुख्य अभियंता एच.के. अवचार, अधीक्षक अभियंता प्रसन्नकुमार गरुड, प्रभारी अधीक्षक अभियंता प्रशांत वंजारी, कामगार नेते हरिराम गीते, श्री भगवान बाबा सेवा मंडळ टीपीएस कॉलनी परळी वैजनाथ चे पदाधिकारी, सचिव विद्यासागर मुंडे, सहसचिव अमोल मुंडे, संदीप बारगजे, वैजनाथ चाटे,सुधीर मुंडे, चेअरमन बालासाहेब गीते, कृष्णा चाटे, नंदकिशोर फड, शंकर नागरगोजे, अतुल नागरगोजे आदी उपस्थित होते.
