1 फेब्रु रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी व्हावे -प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे

🔺 मराठी पत्रकार परिषदेचा मेळावा, पुरस्कार वितरण सोहळा 

🔶 डिजिटल मिडिया परिषदेची बुलढाण्यात जिल्हास्तरीय बैठक उत्साहात 🔶 डिजिटल मिडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी मयुर निकम व श्रीधर ढगे 🔶 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह उल्लेखनीय कार्य करणार्‍या पदाधिकार्याचा झाला सन्मान

बुलढाणा : (एम एन सी न्यूज नेटवर्क) -मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशानुसार मराठी पत्रकार परिषद संलग्नित असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेची बुलढाणा जिल्हा स्तरीय बैठक प्रदेशाध्यक्ष अनिलजी वाघमारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.मागील दोन वर्षात डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात संघटक संघटनात्मक सक्रिय काम केल्याबद्दल खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार बळीरामजी वानखडे तर तसेच चिखली येथील डिजिटल मीडिया परिषदेचे तालुकाध्यक्ष सुनील मोरे राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पथक आणि त्या पुरस्कार मिळाल्याबद्दल नारायण दाभाडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह राजपूत यांची नियुक्ती झाल्याबद्दल डिजिटल मीडिया चे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे व प्रदेश उपाध्यक्ष अनिल उंबरकर यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.

बैठकीमध्ये बुलढाणा जिल्हा डिजिटल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये विभागीय सचिव म्हणून जितेंद्र कायस्थ,घाटावर जिल्हाध्यक्ष झी 24 तास चे जिल्हा प्रतिनिधी मयूर निकम तर घाटाखालील जिल्हाध्यक्ष श्रीधर ढगे ओटीटी न्यूज चे संपादक जिल्हा सरचिटणीस दीपक मोरे,जिल्हा उपाध्यक्ष नारायण दाभाडे, किशोर खंडारे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला न्यूज पोर्टल युट्युब चॅनेल च्या संपादक व पत्रकारांनी सत्य बातमी दाखवून लोकांमध्ये विश्वासाहर्ता वाढवावी असे आवाहन करून भविष्यात डिजिटलच्या पत्रकारांनी अधिस्वीकृती मिळाली पाहिजे, यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख सरांचे मार्गदर्शनात लढा सुरू असल्याचे सांगत येत्या १ फेब्रुवारी रोजी सेलू जिल्हा परभणी येथे होत असलेल्या आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन ही प्रदेशाध्यक्ष अनिलजी वाघमारे यांनी केले.
यावेळी डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शेख वसिमभाई, सरचिटणीस शेख कासिमभाई, हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक राजेश डिखोळकर, आदीसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.