पुण्याचे नवे आयकर आयुक्त, विश्वास मुंडे (IRS)

🔷 आयकर विभाग🔺 IncomeTax ( Pune Commissioner of income tax )

बीड/ परळी वैजनाथ -(एम एन सी न्यूज नेटवर्क) छत्रपती संभाजी नगर आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त विश्वास सोपानराव मुंडे यांची पदोन्नती होऊन आता आयकर आयुक्त, पुणे या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्यावर पुण्याची नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे .

विश्वास मुंडे IRS (Commissioner of income tax pune) बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील कनेरवाडी गांवचे चे भूमिपुत्र आहेत.त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हेरवाडी ता. परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथे झाले व तर Graduation:B Tech (chemical) रासायनिक अभियांत्रिकी नागपूर येथे झाले आहे. ते २००७ च्या UPSC बॅच चे IRS असून संपुर्ण देशात त्यांची 223 रँक होती.

विश्वास मुंडे IRS  यांनी आपल्या सेवा काळात, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, मुंबई येथे काम केले आहे. आता आयकर आयुक्त , पुणे या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे.
मागच्या काही महिन्यापूर्वी त्यांची छत्रपती संभाजीनगर आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आता त्यांच्यावर पुण्याची नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.