🔶 शैक्षणिक सहल
बीड/परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची शैक्षणिक सहल कोल्हापूर व मालवण येथे आयोजित करण्यात आली होती. यास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते. यंदा ही सहल तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर, मालवण, सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली, देवबाग अशी आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना समुद्रातील विविध वनस्पती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देवून प्रत्यक्ष इतिहासातील घटनांची माहिती देण्यात आली.त्याचबरोबर कोल्हापूर येथील शाहू पँलेस, रंकाळा, महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. या सहलीमध्ये विद्यार्थी वर्गामध्ये मोठा उत्साह दिसून आला.
सहलीचे आयोजन संस्थेचे मार्गदर्शक अनिलराव देशमुख, अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख व प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख प्रा प्रविण फुटके, प्रा डॉ विद्या गुळभिले, प्रा डॉ रंजना शहाणे, प्रा विशाल पौळ, प्रा अशोक पवार यांनी सहलीचे आयोजन केले. सहलीमध्ये महाविद्यालयातील हेमलता दुधाट, अनिल कट्टे सहभागी झाले. सहल यशस्वी करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे वाहक नागनाथ राडकर यांनी सहकार्य केले.
