तिसऱ्या दिवशी ही परळी पं.स. समोर अमरण उपोषण चालू

🔷 पंचायत समिती
◾ उपोषणकर्त्याची प्रकृती खाल्ल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात दाखल

बीड/परळी वैजनाथ/प्रतिनिधी- तालुक्यातील भ्रष्ट व कामचुकार ग्रामसेवकाविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी गेली दोन दिवसापासून परळी पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू आहे. उपोषनाचा आजचा तिसरा दिवस आहे.

१५ वा वित्त आयोग या अंतर्गत जी कामे झाली आहेत. त्या कामाची चौकशी करून संबंधिताविरोधात कारवाई करण्यात यावी. गावा अंतर्गत पाणंद रस्ते व खडीकरणाच्या रस्त्याची चौकशी करावी. भ्रष्ट व कामचुकार ग्रामसेवक लेमटे मॅडम यांना निलंबीत करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी विजय बडे गेल्या दोन दिवसापासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत.

परळीत चक्क ग्रामपंचायत सदस्यावर उपोषणाची वेळ आली असून ग्रामपंचायत सदस्य विजय बडे यांचे परळी पंचायत समिती समोर गेल्या दोन दिवसापासून उपोषण सुरू असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. भ्रष्ट ग्रामसेवका विरोधात कारवाई करा या व ईतर मागण्यांसाठी आमरण उपोषण चालू आहे. यात

◾ 15 वा वित्त आयोग, 9010, 2545 अंतर्गत सर्व कामांची चौकशी करुन संबंधीत अधिकारी वे ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

◾गाव अंतर्गत पांदन रस्त व खडीकरण रस्ते यांची चौकशी करुन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावा.

◾गट-ब व गट -क अंतर्गत झालेल्या रेवली पाटी ते. जिल्हा परिषद शाळा पर्यंत झालेल्या डांबरीकरण रस्त्याची चौकशी करून संबधीत अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करुण कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, संबंधित अधिकाच्यां तात्काळ निलंबीत करण्यात यावे. आदी मागण्या उपोषणकर्त्याच्या आहेत.