🔶 महिला खो खो वर्ल्ड चॅम्पियन
मुंबई – वृत्तसंस्था- सर्व भारतीयांची मानउंचावेल अशी अभिमानाची बाब भारतीय महिला संघाने पहिलावहिला खो खो वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडियाने नेपाळवर अंतिम सामन्यात मात करत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नवी दिल्लीत रविवारी 19 जानेवारीला हा महाअंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने नेपाळवर 38 पॉइंट्सच्या फरकाने नेपाळचा धुव्वा उडवला
सलामीच्या सामन्यापासून धमाकेदार कामगिरी सुरु ठेवली होती. टीम इंडिया तशीच कामगिरी अंतिम सामन्यातही केली नेपाळला 78-40 अशा फरकाने पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं.
पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 176 पॉइंट्सच्या मोठ्या फरकाने धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली. टीम इंडियाने त्यानंतर अशीच कामगिरी अंतिम सामन्यापर्यंत सुरु ठेवली आणि वर्ल्ड कप जिंकला.

