🔹 आरोग्य विभाग
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ या संवर्गातील पदभरतीकरीता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सादर करावयाचा कालावधी दिनांक २१ जानेवारी, २०२५ रोजी १४.०० ते दिनांक १० फेब्रुवारी, २०२५ रोजी २३.५९,ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक १० फेब्रुवारी, २०२५ रोजी २३.५९,भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची दिनांक १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी २३.५९,चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्याचे दिनांक १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
