न्या. किरण देशपांडे यांची तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी (एडीजे) पदोन्नती

पालघर/परळी / प्रतिनिधी – परळीचे भूमिपुत्र, कै. रंगराव (मामा) देशपांडे यांचे कनिष्ठ सुपुत्र न्या. किरण देशपांडे यांची तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी (एडीजे) पदोन्नती झाली आहे. यापूर्वी ते दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरपदावर पालघर येथे कार्यरत होते.

नवी नियुक्तीही त्यांना पालघरमध्येच मिळाली आहे. न्या. किरण देशपांडे यांनी पूर्वी पुणे, नागपूर, दिंडोरी, नागभिड (जि. चंद्रपूर), पाटण, औसा येथील न्यायालयात न्यायदानाची सेवा बजावली आहे. न्या. किरण देशपांडे हे परळीतील  विधि शाखेचे शिक्षण आताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले आहे.  त्यांचे पदोन्नतीबद्दल सर्व स्तरातून स्वागत होत आहे.