भारतीय प्रजासत्ताक दिन
बीड, दि,23 :- (जि. मा. का.) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी पोलिस मुख्यालय मैदानावर क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजून 15 मिनिटानी ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण समारंभ होत आहे.
तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते सकाळी 7.45 वाजता संपन्न होणार आहे. दोन्ही ध्वजारोहण समारंभ संपल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा पोलीस मुख्यालय मैदान बीड येथील ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभास सकाळी 8.30 वाजेपूर्वी शासकीय गणवेषात उपस्थित रहावे, असे आवाहन, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
यासह जिल्हयात विविध ठिकाणी ध्वजारोहण केले जाणार असून अपर जिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथील धजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सकाळी 9.15 वाजता तसेच सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
