पौष्टिक तृणधान्याची ओळख,

छायाचित्र: श्रीअन्न योजना 2023 यांच्याकडून साभार

🔷 पौष्टिक तृणधान्याची ओळख

बीड/परळी वैजनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क:
नुकतंच काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कृषी प्रदर्शनात कृषी विभागाने “श्री अन्न आणि पोषक तत्वे” या संदर्भातील एक पुस्तक वितरित केले होते. यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती असून श्री अन्न आणि पौष्टिक तृणधान्याची ओळख नव्याने जनमानसात करून देण्यात आली आहे.
यामध्ये प्रामुख्याने तृणधान्याची ओळख, या तृण धान्याचे पौष्टिकता आणि आरोग्य व आहार दृष्ट्या महत्त्व, आरोग्यविषयक फायदे. विविध पाककृती याचं विवंचन करण्यात आलं आहे.

आम्ही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून समस्त वाचकांना श्री अन्नाची पौष्टिकता तृणधान्याची ओळख आणि त्यातून सहजतेने करता येणाऱ्या विविध आरोग्य दाई पाककृती (रेसिपी) पदार्थ करण्याच्या पद्धती आणि त्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व हे पुनश्य सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.

हे सर्वांच्याच आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अस आहे. निश्चितच एमएनसी न्यूज नेटवर्क च्या सर्व वाचकांना आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना या पौष्टिक तृण धान्याच्या सेवनातून आरोग्यदायी फायदे होतील.

सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी लाभ देणाऱ्या या तृणधान्याच्या ओळखीत प्रामुख्याने येणाऱ्या तृणधान्यात
🔻ज्वारी
🔻बाजरी
🔻नाचणी
🔻वरई किंवा भगर
🔻राळ
🔻राजगिरा
🔻कुटकी
🔻कोड
🔻 असावा
या तृणधान्याचा समावेश होतो. आणि याच्या विविध पाककृती सुद्धा करता येतात. ज्या अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत.

श्री अन्न हे पौष्टिक दृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण आहे. गहू आणि तांदूळ यापेक्षा श्रेष्ठ आहेत कारण ते प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजयुक्त समृद्ध आहेत. ही तृणधान्य ग्लुटेन पासून मुक्त आहेत. तसेच त्यांच्या ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी आहे. ज्यामुळे सेलिऑक किंवा मधुमेह असलेले लोकांसाठी ते अतिशय आदर्श असं अन्न आहे. तसेच तांदूळ आणि गव्हाच्या तुलनेत पौष्टिक तृणधान्य मध्ये कॅल्शियम, लोह, आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे मुलांच्या निरोगी वाढीसाठी ते आवश्यक घटकांना मजबूत करण्यास मदत करतात. यामुळेच श्री अन्न हे पुढील काही वर्षात महत्त्वाचं अन्नपिक राहणार आहे.