श्रीअन्न पौष्टिक तृणधान्य; ज्वारीचे आहारातील फायदे.

🔹 श्रीअन्न पौष्टिक तृणधान्य-ज्वारी

विविध पोषण मूल्यांनी भरपूर अशा लघु तृणधान्य  आपल्याला फार कमी माहिती आहे. भारत सरकारने श्रीअन्न पौष्टिक तृणधान्य या वर्गात त्यांना अधिसूचित करून याबाबत जागृती निर्माण करण्यात येत आहे. कृषी क्षेत्राचे विकास कार्यात बाजरी लघु तृणधान्य पिके उदाहरणात राळा, वरई, बार्टी, नाचणी, कोडो, कुटकी व राजगिरा काही प्रमाणात दुर्लक्षित राहिले. परंतु पौष्टिक दृष्टीने विचार करता उत्तम आरोग्याच्या व आहार विषयक जागृतीमुळे या पिकांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

१- ज्वारीचे आहारातील फायदे.

🔺ज्वारी ही आहारातील थंड, गोड, रक्तविकार कमी करण्यासाठी, पीत्तशामक असून कफ, वायू कारक आहे. पांढरी ज्वारी बलदायक आणि पथ्यकारक असून मुळव्याध, अरुची, वर्ण पडणे, यावर उपयोगी पडते. लाल ज्वारी पौष्टिक थंड, गोड, आणि बलदायी असते. त्रिदोष हारक मात्र किंचित कफ कारक असते.
🔻ज्वारीच्या लाह्या खाल्ल्याने कफ ही कमी होतो ज्वारीपासून बनवलेली गंजी कफ व वायुनाशक असून मुळव्याधीवर अतिशय गुणकारी आहे. 🔻भाकरी थंड आणि वायकरक असते ज्वारीमध्ये मिनरल्स पोटॅशियम मॅग्नेशियम असल्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.🔻 महिला वर्गामधील मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्यावर ज्वारी उपाय कारक ठरते. 🔻ज्वारीमध्ये तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे पोट साफ राहते पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी चपाती ऐवजी ज्वारीची भाकरी नियमित खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे.🔻 ज्वारीमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते त्यामुळे ॲनिमिया सारखा आजार असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीचे पदार्थ खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होतो. 🔻सद्यस्थितीत लठ्ठपणाचा त्रास सगळ्यांनाच होत असून लठ्ठपणा म्हणजे आजाराला निमंत्रण, ज्वारीचे आहारात सेवन केल्यास लठ्ठपण आणि चरबी कमी होण्यास मदत होते.🔻 ज्वारी रक्तवाहिन्या मधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करते.🔻 ज्वारीचे पोषक तत्व मुख्यता मुतखड्याला आळा घालतात तर किडनी स्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी व इतर प्रकारचे ज्वारीचे पदार्थ खाल्ल्यास त्याचा मोठा फायदा होतो.
🔻 ज्वारीमध्ये असणारे पौष्टिक द्रव्य अन्नघटक मधुमेह शरीराची जाडी तसेच इतर बरेचसे आजार कमी करण्यासाठी उपयोगी पडते.🔻 विविध अन्नधान्य मिश्रित पिठामार्फत आपण संतुलित आहार निर्माण करू शकतो. ज्वारीच्या लाह्या आणि शेवया मोठ्या प्रमाणात विरंगुळ्याच्या टाईमपास वेळी अधिक प्रमाणात खाल्या जातात.

ज्वारी पासून पौष्टिक पदार्थ
🔶 ज्वारीची उसळ-
घटक पदार्थ ज्वारी एक वाटी, शेंगदाण्याचा कूट एक ते दोन चमचा, आले -मिरची पेस्ट एक ते दोन चमचे , कढीपत्ता दहा ते बारा पाने ,कोथिंबीर व लिंबाचा रस चवीनुसार. ओल्या नारळाचा खव गरजेनुसार, हिंग ,मोहरी, जिरे व हळद चवीनुसार. तेल फोडणीसाठी एक चमचा.
कृती-
एक ते दोन वाटी ज्वारी सुमारे दहा तास गरम पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये ज्वारी व पाणी टाकून तीन शिट्ट्या घ्या. कढई मध्ये एक पळी तेल घालून त्यात हिंग, जिरे, मोहरी, हळद कढीपत्ता, आणि मिरची पेस्ट घालून फोडणी द्या. फोडणीत शिजलेली ज्वारी टाकून परतून त्यावर काही वेळासाठी झाकण ठेवा. एक वाफ झाल्यावर चार ते पाच मिनिटांनी झाकण काढून त्यात शेंगदाण्याचा कूट, नारळाचा कीस, धने, जिरे पावडर, मीठ, साखर घालून पुन्हा परतून घ्या. परत पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ आणा. त्यात लिंबाचा रस व कोथिंबीर घालून परतून घ्या. अतिशय पौष्टिक अशी ज्वारीची उसळ तयार मिळेल.