🔶 पर्यटन, भ्रमंती, छायाचित्रे, तीर्थस्थळे.
नाशिक : धार्मिक पर्यटनाच्या बाबतीत नाशिकचा अग्रक्रमांक लागतो. नाशिक जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर, शक्तीपीठ वनी आणि नाशिक पंचवटी या भागात देशभरातून पर्यटक येत असतात.
नाशिकला पंचवटी रामकुंड परिसरात देशभरात सुप्रसिद्ध असे अनोख्या बांधकाम शैलीचे काळाराम मंदिर, कपालेश्वर आणि इतर अनेक शिवमंदिरही आहेत.
परिवारातील व्यक्तीच्या मृत्यू पश्चात करावयाचे अनेक विधीसाठी नाशिकच्या रामकुंड परिसरातील गोदाकाठ महत्वपूर्ण मानला जातो या ठिकाणी देशभरातून लोक आपल्या परिवारातील व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून अनेक धार्मिक पूजा अर्चना आणि उपक्रमही येथे करतात. पहाटे हे सर्व विधी आणि मंदिराला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. जानेवारी च्या थंडीत हरवलेल्या गोदाकाठाचे मंदिराच्या पार्श्वभूमीवर हे छायाचित्र निश्चितच मनास सुखद शांती प्रदान करते.
घाटातील मंदिरे आणि लोकांची रोजची दिनचर्या गोदावरीच्या पात्रात प्रतिबिंबित होतानाच हे छायाचित्र टिपलं आहे आयडियल फोटो यांनी.
