परळी तालुक्यात गारपिटीने फळबागासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान

परळी तालुक्यात गारपिटीने फळबागासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान
तहसीलदार सुरेश शेजूळ परळी वै यांची गारपीट भागात भेट,
◾शेतात मोठ्या प्रमाणात गारांचा खच

परळी /प्रतिनिधी :तालुक्यात अवकाळी पावसाने शहर व तालुक्यात शनिवारी हजर लावली या अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचा मोठे नुकसान झाले असून यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

परळी तालुक्यात शनिवारी विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगटासह पावसाने हजेरी लावली एक दिवसापूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे उरात धडधड वाढली असतानाच शनिवारी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या आंबा, कांदा, ज्वारी,गहू, हरभरा यांच्यासह फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत करावी अशी मागणी केली आहे.

गारपिटीमुळे तालुक्यात नुकसान

शनिवारी झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील देशमुख टाकळी, शिरसाळा, पांगरी, वडखेल, कौठळी, गाढे पिंपळगाव, इंजेगाव, वाका, रेवली या गावातील आंबा ज्वारी हरभरा तसेच भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास गारपिटने हिसकावून घेतल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून बळीराजा आता चिंतेने ग्रासला आहे.
……………………………………………………

◾तहसीलदार सुरेश शेजूळ  यानी गारपीट भागात भेट देऊन पिकांची पहाणी केली.
शेतांत असलेल्या वांगे, टमाटे,या भाजीपाला पीक सोबतच रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मौ टाकळी दे,कौठळी,पांगरी तळेगाव प ता परळी वै येथे मा सुरेश शेजूळ तहसीलदार परळी वै यांनी गारपीट भागात भेट देऊन पिकांची पहाणी केली.नुकसान झालेल्या पिकांची पहाणी करुन गावक-यांना धीर दिला. यावेळी सोबत बी. एल. रुपनर (नायब तहसीलदार) परळी वै,सुरेश देशमुख (पोलीस पाटील) स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ टाकळी देशमुख उपस्थित होते.