परळी वैजनाथ शहराचा वाढला सन्मान; आरती बोकरे अन्नसुरक्षा अधिकारी!

🔶 एमपीएसी परीक्षेत मिळवले घवघवीत यश 🔶 भीमनगरात आला आरतीच्या रूपाने पहिला लाल दिवा!

बीड /परळी-वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क –परळी शहरातील अतिशय सामान्य कुटूंबातील मुलगी आरती बोकरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा 2023 दिली होती त्याचा निकाल नुकताच जाहिर झाला असून आरतीने त्या परीक्षेत यशस्वी गरुड झेप घेतली असून ती आता अन्न औषध या विभागात काम करणार असून तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

आरती बोकरे या परळी शहरातील भीमनगर मधील अतिशय सामान्य कुटुंबातील असून तिचे वडील एक खाजगी दुकानात हमाल म्हणून काम करतात.  तर त्यांची आई ही महापारेषण वीज पुरवठा केंद्रात कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करते.  आशा परिस्थितीत तिने कोणत्याही प्रकारचे  क्लास, ना कोणाचे मार्गदर्शन घेतले नाही.  फक्त आई वडील आणि समाजासाठी काम करण्याची जिद्द मनाशी बाळगून अतिशय कष्टने अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देण्याचं स्वप्न मनात ठेवून त्यावर मेहनत घेऊन राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत होणाऱ्या परिक्षा 2023 वर्षात दिली आणि त्याचा निकाल आता नुकताच लागला.  तिने कुटूंबाचे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण केले आहे.

आरती बोकरे यांनी  लोकसेवा आयोगाच्या मार्फत अन्न आणि औषध विभागाची जवाबदारी मिळणार असून परळी शहराला  सन्मान मिळवून  दिला आहे.  सर्व परळीकराना तिचा सार्थ अभिमान आहे.  भीमनगर मध्ये अनेक विध्यार्थी आणि मुलींना तिचा आदर्श मिळणार आहे.  आरती बोकरे यांनी अतिशय  सामान्य कुटूंबातून ही गरुड झेप घेतली आहे. जिद्द आणि परिस्थितवर मात देत तिने स्वतःचे आणि समाजासाठी काम करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.  वडील हमाल असून तिच्या कुटूंबाने तिला पूर्ण साथ देत या काळात तिला काहीही कमी पडु न देता तीने  पाहिलेल्या स्वप्नात सहभागी  होऊन खंबीरपणे पाठीशी उभे राहिले होते. त्याचाच परिणाम तिला हे घवघवीत यश मिळाले आहे.

आरती यांच्या रूपाने परळी शहरातील भीमनगरात पहिला लाल दिवा मिळाला आहे.  त्यात तिने मुली कुठेही कमी नाहीत याचा एक मोठा आदर्श निर्माण करून दिला असून सर्व श्रम करणाऱ्याना एक मोठी उमीद दिली आहे.  तिच्या या यशाचे सर्व स्तरातून मनापासून कैतुक होत आहे.  मित्र परिवार ,कुटूंब स्नेही, समाजातील लोकांनी तिचे स्वागत करून मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.