ठाण्यात दोन आजी-माजी जिल्हा माहिती अधिकारींचा नव वर्षात माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

सत्कार -गौरव 

🔶 उत्कृष्ट अधिकारी श्री.मनोज सानप 🔶 पत्रकारिता क्षेत्रासाठीचा जीवन गौरव पुरस्कार-श्री रणवीर राजपूत

ठाणे – ठाण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते या नव वर्षात आजी-माजी जिल्हा माहिती अधिकारींचा ठाण्यात सत्कार होणं,हा खरं तर,दुग्ध-शर्कराचा योगच म्हणावा.
ठाणे जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज सानप यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर ठाण्याचे पालकमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाला.

वास्तवात राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या उत्कृष्ट कार्याचं हे गमक आहे,असे म्हणणं संयुक्तिक ठरेल. तर माजी जिल्हा माहिती अधिकारी रणवीर राजपूत यांचा नव वर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्याचे पालकमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पत्रकारिता क्षेत्रासाठीचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यासाठी मी ना.एकनाथजी शिंदे अन् शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक प्रमुख श्री.मंगेश चिवटेसर यांचे आभार मानतो अस माजी जिल्हा माहिती अधिकारी रणवीर राजपूत म्हणाले.