🔻राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवती शिबीर
🔷 कुठल्याही गोष्टी पेक्षा केलेल्या सामाजिक कार्याचे आत्मिक समाधान अनमोल सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर
🔶 पत्रकारितेत विद्यार्थिनींना मोठ्या संधी…पत्रकार धनंजय आढाव
बीड/परळी वैजनाथ दि.२७ – प्रतिनिधी- इतर कुठल्याही गोष्टी पेक्षा केलेल्या सामाजिक कार्याचे आत्मिक समाधान अनमोल असते, वेळ मिळेल तेव्हा सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर तर पत्रकारितेत विद्यार्थिनींना मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी धनंजय आढाव यांनी केले. ते तालुक्यातील सेलू येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष युवती शिबीरात बोलत होते.
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत तालुक्यातील सेलू येथे युवती विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर, पत्रकार धनंजय आढाव,बालाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल मुंडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ विनोद जगतकर, प्रा डॉ राजश्री कल्याणकर, प्रा डॉ प्रविण दिग्रसकर, प्रा डॉ रंजना शहाणे, प्रा विशाल पौळ, प्रा प्रविण फुटके उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्री मोगरकर म्हणाले की, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कर होत आहे. इतर कुठल्याही गोष्टी पेक्षा केलेल्या सामाजिक कार्याचे आत्मिक समाधान अनमोल असते, वेळ मिळेल तेव्हा सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. रोजच्या अभ्यास, कॉलेज सोबतच राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष युवती शिबिर विद्यार्थीनींना आपले विचार प्रगल्भ करेल. सोबतच सामाजिक कार्याचा प्रत्यक्ष अनुभव भविष्यात उपयोगी पडेल. यावेळी धनंजय आढाव यांनी पत्रकारिता क्षेत्रातील संधी या विषयावर विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्रा डॉ दिग्रसकर यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ जगतकर तर सूत्रसंचालन प्रा फुटके यांनी केले. शिबिरास परळी रेल्वेचे श्री कांबळे व त्यांची युवा अधिकारी कर्मचारी टीम, त्यांच्या “सोशल एक्स्प्रेस” या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थे तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने शिबिरार्थीसाठी रेल्वे बाबत माहिती व प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींना भारतीय संविधान, स्पर्धा परिक्षेची पुस्तके, भगवतगिता पुस्तके बक्षीस स्वरूपात वितरण केली.
