श्रीमती कृष्णाबाई देशमुख विद्यालयाची माजी विद्यार्थिनी नवनियुक्त अन्न सुरक्षा अधिकारी कु आरती बोकरे हिचा सत्कार संपन्न

🔻वाटा प्रगतीच्या

🔶 एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या माजी विद्यार्थिनी आरती बोकरे यांचा सत्कार

बीड/परळी वैजनाथ- श्री घटेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ घाटनांदूर द्वारा संचलित श्रीमती कृष्णाबाई देशमुख प्राथमिक व माध्यमिक विद्यालय परळी वैजनाथ येथे 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन)रोजी सकाळी 8:00 वाजता श्री घटेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव आदरणीय श्री बाबासाहेब व्यंकटराव देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक आदरणीय प्रा श्री बाबासाहेब वामनराव देशमुख व आदरणीय श्री मधुकर संतराम चव्हाण उपस्थित होते. यानंतर राष्ट्रगीत, राज्य गीत व संविधानाच्या प्रस्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यानंतर शाळेची माजी विद्यार्थिनी कु आरती अज्ञान संदिपान बोकरे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2023 मध्ये घेतलेल्या घेतलेल्या परीक्षेत अन्नसुरक्षा अधिकारी या राजपत्रित पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा घेण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री आटोळकर सर यांनी केले यानंतर या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती असलेल्या नवनियुक्त अन्न सुरक्षा अधिकारी कु आरती अज्ञान संदीपान बोकरे यांचा यथोचित सत्कार श्री घटेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव आदरणीय श्री बाबासाहेब व्यंकटराव देशमुख तसेच संस्थेचे संचालक आदरणीय प्रा श्री बाबासाहेब वामनराव देशमुख आणि श्री मधुकरराव संतराम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी तिचे वडील श्री संदिपान बोकरे व आई सौ. अज्ञान संदिपान बोकरे यांचाही सत्कार करण्यात आला.या सत्काराला उत्तर देताना कु आरती अज्ञान संदीपान बोकरे यांनी सांगितले कि माझ्या या यशाचे श्रेय माझ्या आई, वडील व शाळेतील सर्व गुरुजन वर्गाला जाते. विद्यार्थ्यांनी वेळ वाया न घालता अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले .यानंतर श्री मधुकर चव्हाण यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठीचा मार्ग हा कठोर परिश्रमातुन जातो हे सांगितले.

सदरील कार्यक्रमास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री आटोळकर सर, सर्व शिक्षवृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मोदानी मॅडम नी केले व उपस्थितांचे चे आभार माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर यांनी मानले व शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.