इस्रो/नासा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.

 

परळी – इस्रो व नासाच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी रविवार दि.12 मार्च रोजी जिल्हास्तरीय अंतिम निवड चाचणी परीक्षा बीड येथे घेण्यात आली. या परीक्षेत परळी तालुक्यातील कु. भाविका धनराज( जि. प प्रा शा लाडझरी ) चि.कुंभार कपिल गोपीनाथ( जि प के प्रा शा. पिंपळगाव) व कु.दहिफळे श्रावणी श्रीमंत (जि प प्रा शा खोडवा सावरगाव) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
त्यांची इस्रो /नासा अंतराळ संशोधन केंद्र भेट सहलीसाठी निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालक -शिक्षकांचा सत्कार परळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी संजयजी केंद्रे साहेब ,गटशिक्षणाधिकारी श्रीराम कनाके साहेब, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद कराड, केंद्रप्रमुख शाम राठोड, प्रकाश चाटे, गुहाडे महाराज, परमेश्वर दहिफळे व सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांची उपस्थिती होती.

जि.प शाळेतील विद्यार्थ्यांना अंतरिक्ष केंद्र इस्रो श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश), थुंबा स्पेस म्युझियम तिरुवनंतपुरम (केरळ), विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजी म्युझियम बंगलोर (कर्नाटका) या ठिकाणी जाता यावे यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या वतीने स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्यांच्यातील संशोधन वृत्तीचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांची ओळख व्हावी यासाठी ही परिक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातून ३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे .सदरील परीक्षा प्रथम केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हा स्तरावर घेण्यात आली. यामधून परळी तालुक्यातील सदरील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. आता परळीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी अंतराळ संशोधन केंद्रास भेट देण्यासाठी जात असल्या बद्दल सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.