🔷नाटककार 🔷 दिग्दर्शक 🔷 अभिनेता🔷कलावंत
नाशिक– नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे.नाटककार, आणि दिग्दर्शक सतीश आळेकर यांना तो जाहीर झाला आहे.
सातत्याने रंगभूमीवर सक्रिय असलेले आणि आपल्या प्रसिद्ध महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे या नाटकांसाठी प्रसिद्ध प्रभावशाली नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते सतीश आळेकर यांना नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे.
दोन वर्षातून एकदा दिला जाणारा आणि कुसुमाग्रजांनी सर्जनशील साहित्यासाठी सुरू केलेला जनस्थान पुरस्कार यंदा प्रथमच पूर्णतः नाट्यविश्वाशी संबंधित कलावंताला जाहीर करण्यात आला आहे. येत्या १० मार्च रोजी कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी सायंकाळी ६ हा जनस्थान पुरस्कार वितरण होईल वाजता मान्यवरांच्या हस्ते एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून मान्यवरांच्या हस्ते हा जनस्थान पुरस्कार दिला जाईल.
