🔶 तोकडे,अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्यांना सिद्धिविनायकाचे दर्शन नाही
मुंबई– मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात आता पूर्ण शरीर झाकलेले वस्त्र परिधान केलेल्या भक्तांनाच प्रवेश मिळणार आहे. ट्रस्टने नवीन नियमावलीनुसार भाविक भक्तांसाठी ड्रेसकोड लागू केला आहे. त्यानुसार अंगप्रदर्शन करणारे, तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना यापुढे मंदिरात प्रवेशास मनाई यापुढ केली जाईल.
दक्षिण भारतातील अनेक मंदिरात भाविकांसाठी अंगभर कपड्याचा नियम नियम पूर्वीपासूनच आहे यात प्रमुख्याने तिरुपती बालाजी मंदिर, गुरुवायूर मंदिर या ठिकाणी मंदिराच्या सूचनेप्रमाणेच कपडे अंगभर कपडे असतील तर दर्शन घेता येते
भारतीय परंपरेला साजेसे अंगभर कपडे घालूनच भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनाला यावे, असे आवाहनही मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश मंदिरांमध्ये असा ड्रेसकोड लागू करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ आग्रही आहे.
