परळी मध्ये प्रथमच सद्गुरु जोग महाराज शतकोत्तर पंचम पुण्यतिथी महोत्सव

🔻तीर्थक्षेत्रे 🔻अध्यात्मिक 🔻धार्मिक🔻कीर्तन

🔶स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज शतकोत्तर पंचम पुण्यतिथी महोत्सव श्रीक्षेत्र परळी वैजनाथ

बीड/परळी वैद्यनाथ -महाराष्ट्र न्यूज कनेक्ट नेटवर्क (विशेष वृत्तांकन) श्री संत तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचे 375 वे वर्ष असल्यामुळे तुकोबारायांची ‘साधना व उपदेश’ या विषयावर दिनांक 6 फेब्रुवारी 2025 पासून, गुरुवार 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत परळी येथील कडबा मार्केट समोरील वेअर हाऊसच्या बाजूला असणाऱ्या मैदानावरती महाराष्ट्रातील थोर कीर्तनकारांची कीर्तन सेवा यावेळी संपन्न होणार आहे.

यामध्ये प्रवचन सेवा, अन्नदान, सायंकाळचे अन्नदान, दिवस पहारा, रात्र पहारा, असा पहाटे 4 पासून ते रात्री 9 पर्यंत संपूर्ण दिवस हा कार्यक्रमांचा असेल. आणि या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे 24 तास अखंड ‘विठोबा रखुमाई’ नाम धून सुरू राहील.

दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे 4 ते 6 काकडा भजन 7 ते 12 श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण, दुपारी 3 तीस ते 4 जोग महाराज चरित्र (श्री गुरुवर्य सुदाम जी महाराज आदमने) यांचे असेल त्यानंतर 4 ते 5 प्रवचन 5 ते 6 हरिपाठ सायंकाळी 7 ते 9 दैनंदिन हरिकीर्तन असेल.

🔶 स्थळ -कडबा मार्केट समोर वेअरहाऊस च्या बाजूला नाथ रोड श्रीक्षेत्र परळी वैजनाथ जिल्हा बीड

🔷 खालील प्रसिद्ध अशा महाराजांची प्रवचन सेवा असणार आहे –
————–
🔻श्री.ह.भ.प.एकनाथ महाराज माने वांगी संस्थान

🔻श्री.ह.भ.प.माधव महाराज कुरे, सोनपेठ

🔻श्री.ह.भ.प.ई.के.माऊली चिन्मयानंद स्वामी संस्थान, दर्जीबोरगांव

🔻श्री.ह.भ.प. शाम महाराज नेरकर

🔻श्री.ह.भ.प.लक्ष्मण महाराज कुंडगर

🔻श्री.ह.भ.प. भिमाशंकर गुरुजी एरंडेश्वर

🔻श्री.ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले डिकसळ

🔶अन्नदाते-  दुपारचे अन्नदान –

🔻श्री. केशवराव तांबडे मु. परळी🔻श्री. ज्ञानराज माऊली परिवार, सोनपेठ🔻श्री. नितीनशेठ भंडारे परळी
ग्रामस्थ मंडळ भारसवाडा
श्री सद्गुरू नारायण बाबा संस्थान, वांगी
———————–

🔷 सायं. अन्नदान

🔻ग्रामस्थ मंडळ कन्हेरवाडी, तळेगाव, पांगरी, टोकवाडी ता. परळी
ग्रामस्थ मंडळ उखळी बु., निळा, वडगांव स्टे., नैकोटा, वंदन, अवलगांव ता. सोनपेठ, श्रीमती शोभा विजय जिवरक नेवरगाव
ग्रामस्थ मंडळ लोकरवाडी, इंदपवाडी,श्री. सुखदेव गेनदेव वाघ बाबा ग्रामस्थ मंडळ दिंद्रुड ,ग्रामस्थ मंडळ बोधेगाव, कावळेवाडी, सोनहिवरा, राक्षसवाडी, मांडेखेल, नागपिंपरी
—————–
🔻अल्पोपहार-श्री.रावते काका रांजणगाव, श्रीमती अनुसया दासराव शिंदे पेठवडज ता. कंधार, श्री परमेश्वर विश्वनाथ चाळक, श्री. बाळासाहेब बनसोडे, श्रीमती सोनुबाई गावंडे, श्री सोनवणे साहेब, श्री. आबा केदारे अंतरगाव, श्री वानखरे साहेब, श्री.लक्ष्मीकांत आलोने, श्री. काळे गुरुजी मणूर, श्री संत तुकाराम महाराज मंदिर, पूर्णा.

|🔶 माघ वद्य १। गुरुवार, दि. १३/२/२०२५ ला सकाळी १० ते १२ या वेळेत श्री.ह.भ.प. गुरुवर्य पद्माकरजी महाराज पाटोळे यांचे काल्याचे कीर्तन होईल.

🔶 दैनंदिन कार्यक्रम-🔶

पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ७ ते १२ श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण, दुपारी ३.३० ते ४ जोग महाराज चरित्र
( श्री.गुरुवर्य सुदामजी महाराज आदमाने ), ४ ते ५ प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ, सायं.७ ते ९ हरिकीर्तन.
————-
🔶 टिप – हे वर्ष श्री तुकोबारायांच्या वैकुंठगमनाचे ३७५ वे वर्ष असल्यामुळे दररोज सायं. ७ ते ९ या वेळेत श्री तुकोबारायांची साधना व उपदेश या विषयावर कीर्तन होतील.
———-
🔻२४ तास अखंड विठोबा रखुमाई नामधुन होईल.
——————
🔷 विनीत – श्री विठ्ठल आश्रम परिवार गंगापूर, छत्रपती संभाजी नगर.