कार ने उडवल्यामुळे परळी -अंबाजोगाई मार्गावरील कनेरवाडी गावांत महिलेचा मृत्यू

परळी– परळी आणि परिसरात रस्ते अपघातात दगावणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बेदरकारपणे वाहन चालवणे, अशा घटनांमुळेच अपघात घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. शनिवार दिनांक 18 मार्च रोजी कार ने उडवल्यामुळे परळी-अंबाजोगाई मार्गावरील कनेरवाडी गावांत एका महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे.

परळी अंबाजोगाई मार्गावरील शहरापासून जवळच असलेल्या कनेरवाडी गावामध्ये आज शनिवार दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान कारणे एका महिलेस ठोकरल्याचा गंभीर अपघात झाला असून यात गावातील भागीरथाबाई नामदेव रोडे (वय 38)या महिलेचा अपघात स्थळीचं मृत्यू झाला.

सदरील कार (एम.एच. २२-एएच १२३५) परळी हुन अंबाजोगाई कडे जात होती. घटनास्थळी परळी ग्रामिण पोलीस ठाण्याचे मारुती मुंडे व ग्रामीण पोलीस तात्काळ धावून गेले.