बीड -परळी–वैजनाथ / प्रतिनिधी- संस्कार प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आज पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा शानदार जल्लोष, मान्यवरांचे प्रेरणादायी विचार, आणि शाळेच्या यशाचा गौरव सोहळा यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरणार आहे.हा कार्यक्रम पद्मावती गल्लीतील मंदिर समोर होईल.
या सोहळ्याचे उद्घाटन अनिल चोरमले (उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई) यांच्या हस्ते होणार असून, पी. एस. घाडगे (मा. अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ ) अध्यक्षपद भूषवतील. विशेष उपस्थिती म्हणून श्रीमती तृप्ती अंधारे (शिक्षणाधिकारी योजना, जि. प. लातूर) उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रा.जे .पी. शेळके (शिछत्रपती पुरस्कार विजेते तथा विश्वस्त – नारायणगड संस्थान, बीड ), धनंजय ढोणे (पोलीस निरीक्षक, संभाजीनगर पोलीस स्टेशन, परळी), दिगंबररा धुमाळ ( अध्यक्ष – पद्मावती शिक्षण संस्था, परळी वैजनाथ ),श्रीराम करडकर (झोनल ऑफिसर, बँक ऑफ इंडिया तथा माजी विद्यार्थी – संस्कार प्राथमिक शाळा ),श्रीमती मारकोळे गीता (रिल्स स्टार ), श्रीमती प्रेमिलताताई तांदळे (माजी मुख्याध्यापिका – संस्कार प्राथमिक शाळा), कैलास तांदळे, (उपाध्यक्ष – पद्मावती शिक्षण संस्था ) दिपक तांदळे (सचिव – पद्मावती शिक्षण संस्था) आदीसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
आजच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थी विविध कलाप्रकार सादर करणार आहेत. संस्कार प्राथमिक शाळेतील शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. गुणवंताना गौरवचिन्हे, प्रमाणपत्रे आणि पारितोषिके देण्यात येणार आहेत. तरी परळी शहर व तालुक्यातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी मारुती मंदिरच्या प्रांगणात, पद्मावती गल्ली येथे सायंकाळी 6 वाजता सुरु होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी, संस्कार प्राथमिक शाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

