🔷 एमजीएम रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास
छत्रपती संभाजीनगर :अस्सल ग्रामिण मराठवाडी बाज भाषा आणि लिखाण. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील लेखक, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रावसाहेब रंगनाथ बोराडे तथा रा. रं. बोराडे वय (८५) यांचे मंगळवारी (दि. ११) सकाळी संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुलभा बोराडे, मुली प्रेरणा, तृप्ती,
मंजूश्री, अरुणा आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली.
२५ डिसेंबर १९४० रोजी रा रं बोराडे यांचा लातूर जिल्ह्यातील काटगावसारख्या लहाण गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. ते येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले. त्यांनी वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालय, परभणीच्या शिवाजी महाविद्यालय आणि छत्रपती संभाजीनगरातील देवगिरी महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते.
रा. रं. बोराडे यांनी ग्रामीण साहित्यासोबतच विविध प्रकारचे लिखाण केले असून . त्यांनी मराठवाडी भाषेचा बाज त्यांच्या साहित्यात उतरविला होता. कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, विनोदी साहित्य निर्माण केले. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि ग्रामीण साहित्य चळवळ, अशा विविध क्षेत्रांत त्यांनी भरभरून साहित्यनिर्मिती केली.
🔶 साहित्यसंपदा
कादंबऱ्या 🔻आमदार सौभाग्यवती 🔻आयुष्याच्या सायंकाळी 🔻इथं होतं एक गाव 🔻कथा एका तंटामुक्त गावाची 🔻चारापाणी (हिंदीत तिनका) 🔻 तिळा तिळा डिकी उघड 🔻नामदार श्रीमती 🔻पाचोळा 🔻रहाटपाळणा 🔻राजसा🔻 रिक्त अतिरिक्त 🔻वळणाचं पाणी 🔻सावट 🔻हरिणी

