शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांच्या निधन

🔻शास्त्रीय संगीत🔻हिंदुस्थानी संगीत🔻

मुंबई– ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांच्या निधनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील अनमोल स्वर हरपला आहे. त्यांच्या सुरेल आवाजाने कित्येकांच्या दिवसाची सुरुवात होत असे, तर अभंग, भजन आणि भावगीतांनी नवी रसिक पिढी घडवली. गुरू-शिष्य परंपरेचा लौकिक राखत त्यांनी हिंदुस्थानी संगीतात मोलाचे योगदान दिले. त्यांचे स्वर आणि योगदान अमर राहील, मात्र त्यांच्या जाण्याने संगीतविश्वाची अपरिमित हानी झाली आहे. मी कारेकर कुटुंबियांच्या आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी मुख्यमंत्री यांनी प्रार्थना केली.