श्री संत नरहरी महाराज मंदिराच्या सभागृहाला दिला २० लाखाचा निधी

श्री संत नरहरी महाराज मंदिराच्या सभागृहाला दिला २० लाखाचा निधी

पंकजाताई मुंडेंचे सुवर्णकार समाजाने भेटून मानले आभार

परळी वैजनाथ ।दिनांक२०।
शहरातील सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत नरहरी महाराज मंदिराच्या सभागृहासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी २० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी दिल्याबद्दल सुवर्णकार समाजाच्या शिष्टमंडळाने आज पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत.

शहरातील श्री संत नरहरी महाराज मंदिराच्या गाभारा आणि शिखर कामाचा तसेच पुनर्निर्माण कामाचा शुभारंभ पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते जानेवारीत झाला होता. मंदिराच्या सभागृहासाठी यापूर्वी त्यांनी स्थानिक विकास निधीतून दहा लाखाचा निधी दिला होता, ते सभागृह पूर्ण झाले आहे मंदिर पुनर्निर्माणासाठी यापुढेही संपूर्ण सहकार्य करू असा शब्द त्यांनी याप्रसंगी दिला होता. तो शब्द पाळत त्यांनी जिल्हा विकास नियोजन आराखडय़ातून २० लाख रूपये निधी सभागृह विस्तारीकरणासाठी मंजूर करून दिला आहे.

निधी मंजूर करून दिल्याबद्दल समाजाच्या शिष्टमंडळाने आज पंकजाताई मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आभार मानले. यावेळी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राहूल टाक यांनी पंकजाताई मुंडे यांचा सत्कार केला. याप्रसंगी उपाध्यक्ष सुनील (मामा) दहिवाळ, बालाजीसेठ टाक, ज्येष्ठ नेते राजाभाऊ दहिवाळ, भरतसेठ टाक, विजय दहिवाळ, सूर्यकांत कुलथे, सतीश डहाळे, बाबुरावजी शहाणे, दिलीप बुरांडे, संतोष उदावंत, गणेश बोकन, सोमनाथ शहाणे, सचिन दहिवाळ, काशिनाथ शहाणे, संदीप टेहरे, गजानन डहाळे, राजू बंगाली, बाळू घवले, विशाल डहाळे, रोहित बोकन, अशोकराव दहिवाळ, रमेशराव धारासुरकर, हर्षल शहाणे, विशाल शहाणे, राजु बोकन, अनिल दहिवाळ, वैजनाथ कुलथे आदी उपस्थित होते. अशोक (बाळु) शहाणे यांनी याचे प्रास्ताविक केले.