माहिती तंत्रज्ञान
🔹राज्यात कुठूनही मराठी भाषेतून करता येईल भाडेकरार
पुणे : आता ऑनलाइन भाडेकरार राज्यभरातून कुठूनही नोंदविता येणर असून, त्यासाठी भाडेकरार २.० दी प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यत १७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येत आहे. पक्षकारांची माहिती आधार क्रमांकाद्वरे थेट आधार पोर्टलवरूनच घेण्यात येणर असल्याने फसवणुकीचे प्रकार टळणार आहे. हा भाडेकरार आता मराठीत्न उपलब्ध करून देण्यात आला असून येत्या पंधरा दिवसात ही प्रणाती राज्यभर लागू होईल.
गेल्या वर्षभरात राज्यात १३ लाख १० हजारांहून अधिक जास्त भाडेकरार ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यात आले आहेत. पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर या विभागात भाडेकरारांची विक्रमी दस्त नोंदणी होत असते. प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यात ही प्रणाली १७ फेब्रुवारीपासून अमलात येणार आहे. त्यातील त्रुटी लक्षात घेऊन येत्या पंधरवड्यात ही प्रणाली सबंध राज्यभर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रणालीमुळे राज्यात एका ठिकाणाहून अन्य जिल्ह्यांत भाडेकरार ऑनलाईन करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक (माहिती तंत्रज्ञान) अभयसिंह मोहिते यांनी दिली.तसेच भाडेकरारासाठीचे शुल्क भरण्यासाठी याच पोर्टलवरून क्युआर कोडचा वापर करून ‘पे टू आयजीआर’ या प्रणालीचा वापर करता येणार आहे. पक्षकारांचे आधार क्रमांक यात टाकल्यानंतर त्यांची सबंध माहिती आधार पोर्टलवरूनच मिळविली जाणार आहे.

