महाराष्ट्रात पिक विमा व अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम जमा होऊनही प्रशासनाकडून शेतकऱ्याला वाटप करण्यास वेळ का लागतो ? वसंत मुंडे

मुंबई – महाराष्ट्रात पिक विम्या व अतिवृष्टीची अनुदान रक्कम वेगवेगळ्या जिल्ह्यात शासनाकडून वर्ग करूनही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा का होत नाही असा आरोप ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला . केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनेतुन रक्कम शासनाकडून जिल्हा अधिकारी यांच्याकडे वर्ग केलेली आहे, परंतु पिक विमा कंपनी व जिल्हाधिकारी प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जाणून-बुजून रक्कम वर्ग करण्यामध्ये वेळ लावला जात आहे .त्यामुळे शेतकरी प्रशासनावर नाराज असून त्वरित बँकेच्या खाते मध्ये रक्कम जमा झाले नाही तर शासनाकडे महाराष्ट्रातील जे जिल्हाधिकारी व प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे केली.

सन 2019 पासून शेतकऱ्यांना पिक विमा देण्यामध्ये टाळाटाळ विविध खाजगी कंपनीकडून केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे व राज्य सरकारचे आदेश असूनही पिक विमा कंपन्या विमा देण्यास आजतागायत शेतकऱ्यांना टाळाटाळ करीत आहेत सर्व जबाबदारी प्रशासनाचीअसून ज्या पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पिक विमा देण्यास असमर्थ आहेत ,आशा कंपनी वर कायदेशीर कारवाई करून त्यांचे आर्थिक व्यवहार गोठावीत यावेतअसी मागणी महाराष्ट्र शासनाकडे वसंत मुंडे यांनी केलेली आहे .राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा बँकेकडे विविध शेतकऱ्याचे खाते असून अद्यापही अतिवृष्टीचे अनुदान व पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जात नाहीत . यासंदर्भात जे जबाबदार अधिकारी या विषयासंदर्भात असतील त्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.