मुंबई – मडगाव मार्गावर मध्य आणि कोकण रेल्वेच्या स्पेशल गाड्या

🔶 कोकण रेल्वे- 🔺 सीएसएमटी ते मडगाव आणि 🔺 एलटीटी ते मडगाव दरम्यान स्पेशल ट्रेन 🔺 होळी-शिंम गोस्तव 

मुंबई : यंदा होळीकरिता आपल्या आहे. ही गाडी अनुक्रमे ७, १४ मार्च रोजी मूळगावी जाण्यासाठी चाकरमान्यांची
लगबग सुरु झाली आहे. या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेतर्फे स्पेशल गाड्या चालविण्यात येणार आहे. यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.होळी निमित्त कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी जातात. परंतु नियमित गाड्या  झाल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्यांच्या सोयीसाठी स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे.

सीएसएमटी ते मडगाव आणि एलटीटी ते मडगाव दरम्यान स्पेशल ट्रेन धावणार आहेत. गाडी नंबर ०११५१ सीएसएमटी- मडगाव स्पेशल गाडी सीएसएमटीवरून ६, १३ मार्च रोजी रात्री १२.२० वाजता सुटेल ही गाडी दुपारी १.३० वाजता मडगावला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी गाडी नंबर ०११५२ मडगाव ते सीएसएमटी स्पेशल गाडी मडगाव येथून ६, १३ मार्च रोजी दुपारी २.१५ वाजता सुटून त्याच दिवशी मध्यरात्री ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

गाडी नंबर ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते  मडगाव स्पेशल गाडी १३, २० मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल. ही गाडी दि.   १४ आणि दि.  २१ मार्च रोजी दुपारी १२.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीच्या प्रवाससाठी गाडी नंबर ०११३० मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी १४, २१ मार्च रोजी मडगाव येथून दुपारी १.४० वाजता सुटेल. ही गाडी २२ मार्च रोजी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.