तू सुंदर दिसतेस’ असा मेसेज पाठवणे म्हणजे विनयभंगः

🔷 न्यायालयाचे निरीक्षणे

🔴 असे मेसेज महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे, कोर्टाचा निर्णय.

मुंबई – सद्यस्थितीत स्थितीत महिलांबाबतचे कायदे अतिशय कठोर होत असून नुकताच एक निर्णय दिंडोशी न्यायालयात पाहायला मिळाला. जर तुम्ही एखाद्या अनोळखी महिलेला तू मला आवडतेस असा मेसेज केला, तर तुम्हाला कोर्टाकडून थेट शिक्षा होऊ शकते.

मुंबई उपनगरातील दिंडोशीमध्ये घडलेले एका एका घटनेप्रकरणी कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अनोळखी महिलेला तू खूप सुंदर दिसतेस असा मेसेज पाठवणे म्हणजे विनयभंगच, असे निर्देश दिंडोशी सत्र न्यायालयाने दिले आहे.

या प्रकरणासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार तक्रारदार महिलेने केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,अनोळखी पुरुष रात्री अपरात्री, अवेळी मेसेज आणि फोटो पाठवायचा. ‘तू सुंदर आहेस.असं लिहायचा. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.

विशेष म्हणजे  या प्रकरणात कोर्टाने  आरोपीला दोषी ठरवले होते. त्याला तीन महिने तुरुंगवास शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आरोपी पुरुषाने यानंतर त्याने दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली. दिंडोशी सत्र न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी करण्यात आली. यावेळी आरोपीने आपली बाजू कोर्टातआपले म्हणणे मांडले मात्र माननीय न्यायालयाने  आरोपीचा युक्तिवाद फेटाळून लावत त्याच्याकडील पुरावे सिद्ध होत नाहीत असे स्पष्ट सांगितले.