माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड काका तसेच ॲडव्होकेट राजेश्वर चव्हाण यांची उपस्थिती.
सर्व आघाडी व फ्रंटल सेलच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याची आवाहन
एम एन सी न्यूज नेटवर्क दि. 22) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य यांची गुरुवार दिनांक २३ मार्च रोजी दुपारी ठिक ३:०० वाजता आ.धनंजय मुंडे साहेब यांच्या जगमित्र संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री श्री. जयसिंगरावकाका गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होवू घातलेल्या निवडणुका, बूथ रचना तसेच विविध संघटनात्मक विषयांवर व माजी मंत्री आ.धनंजय मुंडे साहेब यांनी पक्षास दिलेल्या विविध सूचना, आगामी काळातील विविध रचना याबाबत या महत्वपूर्ण बैठकीत आढावा घेतला जाणार असून बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर आबा चव्हाण बैठकीस मार्गदर्शन करणार आहेत.
सदर बैठक धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालय येथे दुपारी 3.00 वा. आयोजित करण्यात आली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदारसंघातील सर्व आघाडी व फ्रंटल सेलच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोविंदराव देशमुख (विधानसभा अध्यक्ष) लक्ष्मण तात्या पौळ(तालुकाध्यक्ष) तसेच बाजीराव भैय्या धर्माधिकारी (शहराध्यक्ष) यांनी केले आहे.

