🔶 महाशिवरात्री 🔶 ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ
◾मंदिर परिसरात हर हर महादेव, बम बम भोले याचा जयघोष.
◾ मंगळवारी रात्री अलंकार पूजन नंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले.
◾ लाखो भाविकांनी घेतले दर्शन
◾”ओम नमः शिवाय” धून मंदिर परिसरात घुमत होती. तर शिवशंभो चा जयघोष सर्व रांगांमधून केला जात होता.
बीड-परळी- वैद्यनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ येथे भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परळी येथील श्री वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्र महोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असून दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. हर हर महादेव, वैद्यनाथ भगवान की जय असा जयघोष रागांमध्ये निनादत होता. आज श्रींच्या दर्शनासाठी सुमारे चार ते पाच लाख भाविक येतील असा अंदाज होता. मध्यरात्री बारा वाजल्यापासून मंदिरात दर्शनाच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी साडे चार च्या सुमारास पासधारकांची रांग न. प .शेजारील वैद्यनाथ प्रतिष्ठान पर्यंत पोहोचली होती. आठच्या सुमारासच लाखो भाविक मंदिर परिसरात दिसून येत होते, तर पश्चिम घाटावरील मोठ्या पायऱ्यावर मंदिरापासून शेवटच्या पायरी पर्यंत महिला आणि पुरुषांची मोठी गर्दी होती.
महाशिवरात्री निमित्ताने या पावन पर्वावर श्री ज्योतिर्लिंग दर्शनासाठी मोठ्या संख्येने राज्यासह शेजारील आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आदी राज्यातील भाविकांनची मोठी गर्दी होती.
🔷 रेल्वे, राज्य परिवहन बस या सोबतच हजारो भाविक भक्त सहकुटुंब खाजगी वाहनाने शहरात दाखल होत होती. या सर्व वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था पोलीस अधिकारी कार्टरच्या बाजूस आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या समोर करण्यात आली होती .
🔷 शिस्तबद्ध रांग व्यवस्थेमुळे लाखों भाविकांना सुलभ दर्शनाचा लाभ घेता आला. सुरक्षेच्या दृष्टीनेही पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन सज्जा आणि तत्पर असल्याचे दिसून येत आहे. रांगांमध्ये पिण्याचे फायदे जागोजागी दिसून उपलब्द होते.
◾ फराळ, पिण्याचे पाणी याचे स्टॉल◾
महाशिवरात्रीच्या निमित्ताने शहरात दाखल होणाऱ्या भाविकांना विविध सामाजिक संस्था, सेवा संघटना ,पदाधिकारी यांनी मंदिर परिसरात जागोजागी फराळ, केळी, साबुदाणा उसळ, फराळी चिवडा, स्वच्छ पिण्याचें पाणी आदी सुविधा सेवा उपलब्ध करून दिल्या.
🔶 यात्रेनिमित्त शहरात विविध खेळाचे प्रकार लहान मोठे राहट पाळणे, मेरी गो राऊंड टोरा टोरा, बच्चे कंपनीसाठी ड्रॅगन, ज्वेलरी, क्रोकरी, मुलांसाठी खेळण्याचे साहित्य विक्रेते, खाण्याचे पदार्थ विकणारे विविध व्यावसायिक हॉटेल्स ही शहरात यात्रेकरूंसाठी सजली आहेत.
🔶 महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यातील शिव मंदिरे गजबजली
तालुक्यातील धर्मापुरी, टोकवाडी, जिरेवाडी, आणि परिसरात असलेल्या इतर शिव मंदिरात भाविक भक्तांचा उत्साह दिसून आला,तर श्री सोमेश्वर संस्थान व जिरेवाडी गावकरी मंडळीं परंपरागत असलेल्या या श्री सोमेश्वराचा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. जिरेवाडी येथुन पालखी सोहळ्यास प्रारंभ होतो. टाळकरी मंडळी, लहान मुलामुलींचे टिपरी पथक, लेझीम पथक, कलशधारी महिला व परीसरातील भाविक या सोहळ्यात सहभागी होते.
शहरातील सुर्वेश्वर मंदिर, औद्योगिक वसाहतीतील महाकाल, अंबवेश आणि जाजूवाडीतील विठ्ठल मंदिरे, संत जगमित्र नागा मंदिर, संत सावता महाराज,श्री संत नरहरी महाराज आदी मंदिरात श्रद्धाळू ची मोठी गर्दी दिसून आली.

