🔹सीएसएमटी स्थानकात १५ तासांचा विशेष ब्लॉक
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी) प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ वर लांब पल्ल्याच्या २४ डब्यांच्या रेल्वे गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म विस्तारीकरण प्री नॉन-इंटरलॉकिंग काम पूर्ण करण्यासाठी दोन दिवस ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. सीएसएमटी स्थानकात हा ब्लॉक शनिवारी आणि रविवारी दोन दिवस प्रत्येकी पाच तासांचा असणार आहे. या कामामुळे मध्य रेल्वेच्या तब्बल ५९ लोकल गाड्या आणि ३ मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द असणार आहेत. याशिवाय, अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या दादर, ठाणे आणि पनवेलपर्यंत चालवण्यात येणार असल्यची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिली.
सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १२ आणि १३ फलाटांची लांबी २४ डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी परिपूर्ण करण्यात येत आहे. फलाट विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उद्या शनिवारी शेवटची लोकल
सीएसएमटी रात्री १०.४६ वाजताची स्थानकावरून शेवटची लोकल सीएसएमटी- ठाणे धिमी लोकल असणार आहे. तर शेवटची जलद लोकल सीएसएमटी- बदलापूर लोकल रात्री १०.४१ वाजताची आहे. तर, हार्बर मार्गवरील शेवटची लोकल रात्री १०.३४ वाजताची सीएसएमटी-पनवेल लोकल, तर रात्री ११.२४ सीएसएमटी- गोरेगाव लोकल असणार आहेत.
🔹 मेल-एक्स्प्रेस रद्द
शनिवारी – रविवारी ट्रेन क्रमांक ११००८/०७ पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२१२८/२७ पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस. मराठवड्यातून हुजूर साहेब नांदेड-मुंबई धावणारी गाडी क्रमांक १७६१८/१७ नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस रद्द आहे.

