बीड जिल्ह्यातील धारूर येथे कोट्यवधी किमतीची अफू,पोलिसांचा छापा

🔺धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथे अफूच्या शेतात पोलिसांचा छापा !

🔺सुमारें ४ कोटी ३२ लाख रुपयांचा अफू हस्तगत

बीड-धारूर –तालुक्यातील पिंपरवाडा येथे रामहरी तिडके यांनी शेततळे खोदून त्याच्याद्वारे अफूला पाणीपुरवठा करत अतिशय दुर्गम भागात जिथे सहज जाणं शक्य नाही अशा ठिकाणी अफूची शेती पिकवली आहे. अफू पिकवणे कायद्याने निर्बंध घातलेले असताना रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने अफूची शेती होत असल्याचे उघडकिस आल्यानंतर खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामहरी कारभारी तिडके वय 42 वर्षे रा पिंपरवडा ता. धारूर जि. बीड त्याचा मालकीचे शेत गट नं 33 मध्ये मौजे पिंपरवाडा ता धारूर जि. बीड येथे मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे छापा टाकला असता यातील आरोपी यांच्या गट नं 33 मधील शेतात अफु या अंमली पदार्थच्या झाडाची बेकायदेशीर विनापरवाना व्यापा व्यावसायीक विक्रीच्या उद्देशाने लागवड करुन अंमली पदार्थ अफुची पांढरी शुभ्र फुले व त्यास गोलाकार बोंड असलेली हिरवी व पिंपळसर पाने असलेली झाडे मुळासह ज्याना 42 गोन्यामध्ये टाकुन त्याचे वजन केले असता गोन्यासह एकून वजन 540 किलो 759 ग्रॅम येवढे असुन प्रती किलो 80,000/- रूपये प्रमाणे त्याची एकूण किंमत अंदाजे 4 कोटी 32 लाख 60 हजार 720/- रूपये अशी आहे

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनीयम 1985 चे कलम 8 (b), 15, 18 प्रमाणे गुन्हा दाखल करुन करण्यात आला आहेत. सदरची कामिगरी ही पोलिस अधीक्षक नवनीत काँवत बीड, सचिन पांडकर अप्पर पोलिस अधीक्षक बीड, श्रीमती चेतना तीडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उस्मान शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलिस उप निरीक्षक .महेश विघ्ने ,
पोलिस उप निरीक्षक हनुमान खेडकर, व तुषार गायकवाड , महेश जोगदंड, भागवत शेलार, बप्पासाहेब घोडके , संजय जयभाये ,देविदास वाघमोडे , भुसारी यांनी केली आहे.