नंदलालजी बियाणी यांचे निधन


जयप्रकाश(बारीक) बियाणी यांना पितृशोक

एम एन सी न्यूज नेटवर्क- परळी येथील प्रतिष्ठित व्यापारी नंदलालजी बियाणी यांचे आज सकाळी 6 वाजता वयाच्या 80 व्यावर्षी दुःखद निधन झाले आहे जयप्रकाश (बारीक),ओमप्रकाश, संतोष बियाणी यांचे नंदलालजी बियाणी वडिल होत.चंदुलालजी बियाणी,सतिषसेठ बियाणी व जगदीशसेठ बियाणी यांचे ते काका होते.

स्व.नंदलालजी बियाणी हे अतिषय धार्मीक व सुस्वभावी होते यांचे आज सकाळी 6 वाजता दुःखद निधन झाले असुन त्यांची अंत्ययाञा गणेशपार येथुन निघुन राजस्थानी मुक्ती धाम येथे दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर विधीवत अंत्यसंस्कार होणार आहेत.
नंदलालजी बियाणी यांच्या पश्चात भाऊ,2 बहिणी,पत्नी,3 मुले,1मुलगी,जावई,नातवंड असा मोठा परिवार आहे.