🔶 महिला दिन विषेश
पुणे– पंडित मर्ढेकर: स्वकुळ साळी महिला समिती तर्फे जिव्हेश्वर भवन कोंढवा, पुणे येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सौ. दीप्ती भूषण साळी (मंचर ) व सौ. वैशाली अजय ठाणेकर (बदलापूर ) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात पैठणी व सन्मान चिन्ह देऊन कर्तबगार महिलांचे विशेष सत्कार करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संखेने महिला युवती उपस्थित होत्या.
1) डाॅ.श्वेधा गिरीश जाळींद्रे. पीएचडी (कम्युनिटी हेल्थ आॅफिसर)
2) लता भागवत (आदर्श माता)
3) रोहिणी कोळेकर (मॉडेलिंग,व Mrs पुणे ‘पुरस्कार विजेत्या )
4) पूनम अष्टेकर (ट्रेपरीशॉप, नुत्य, रांगोळी, गाणे, अष्टपैलू)
5) प्राची एक्के (उत्कृष्ट पत्रकार, मुलाखत घेण्यास निष्णात)
6) सौदामिनी सातपुते (पर्यटन सहलीच्या आयोजिका )
राजेश उगले यांनी महिला दिन कार्यक्रमास 10 पैठणी दिल्या तर या वेळी विविध कला गुण दर्शन खेळ पैठणी चा घेण्यात आला.उत्कृष्ट महिला वेशभूषा (ऐतिहासिक, पौराणिक) कार्यक्रम झाला. विजेता महिलेस सोन्याची नथ (हिरा ज्वेलर्स यांच्या सौजन्याने देण्यात आली.

