
🔶जागतिक महिला दिन साजरा
बीड-परळी – वैजनाथ – एम एन सी न्यूज नेटवर्क,: नगर परिषद परळी वैजनाथ आणि भारत माता शहर स्तर संघ (CLF) परळी यांच्या वतीने ११मार्च मंगळवारी न प सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्येक्रमाचे अध्यक्षा कोटगिरे फील्ड ऑफिसर स्टेट बँक ऑफ इंडिया गांधी मार्केट शाखा,,प्रमुख मार्गदर्शक दैवशाला घुगे, स्त्री रोग तज्ञ परळी, प्रमुख पाहुणे श्रीमती गोदावरी कावरे, कल्पना चाटोरिकर जिल्हा उद्योग केंद्र परळी, श्रीमती मीना नेहरकर, स्वाती अष्टेकर, भारत माता शहर स्तर संघाचे सचिव शिल्पा कसबे, अंबिका परदेशी अध्यक्षा, महेश अंजान ,श्री सतीश खेबाळे ,दीपक शेगुळे सीआरपी आम्रपाली पैठणे, अरुणा जगताप, आदि उपस्थित राहिले,
कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवराचे नगर परिषद परळी ( DJAY-S ) कर्मचारी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यानंतर कार्येक्रमाचे प्रास्ताविक श्री सतीश खेबाळे यांनी २०१४-२०२५ या मागील दहा वर्षात परळी शहरात काम केले यात महिला बचत गट ऐकून ४७० बचत गटाची स्थापना केली आणि १६ वस्ती स्तर संस्था बांधणी करून महिलाना फिरता निधी, कर्ज वाटप करून स्वतच्या पायावर उभे राहण्यास व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येते याशिवाय शहरातील फेरीवाला लाभार्थी यांना pmswanidi योजनेतून शहरातील विविध नॅशनल बँक मधून कमीत कमी कागदपत्र सोबत ऑन लाइन अर्ज केले आहेत. आतापर्यंत ऐकूण 1750 लोकाना कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये ऐकून २२५० ऑन लाइन अर्ज सादर केले आहेत. याशिवाय स्वनिधी से समृद्धी या योजनेत १४५३ लाभार्थी यांचे मोबाइल मध्ये सर्वेक्षण उदिष्ट देण्यात आले यापैकी ११०४ लाभार्थी यांचे करण्यात आले या लाभार्थी यांना शासनाच्या ८ योजनेला जोडणी करून लाभ दिल जातो. शहरातील १६ वस्ती स्तर संघ स्थापन केले यातील उपस्थित अध्यक्षा सचिव यांचे मान्यवर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले.
ऑक्टोबर ते मार्च या नवीन दीनदयाळ आजीविका योजना शहरी यामधून clf कडून ऐकून १९ महिला बचत यांना ६३,००००० /- त्रेसठ लक्ष रुपये कर्ज वाटप केले या महिला बचत गट यांना वाटप पत्र देण्यात आले .
◾ या नंतर उपस्थित मार्गदर्शक अभया कोटगिर स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी बँक निगडीत महिला बचत गट यांना कर्ज दिले जाते, स्वनिधी योजनेतून दहा ते पन्नास हजार रुपये कर्ज घेतले यांनी हप्ता वेळवर भरण्यात यावे असे सांगितले.
◾ डॉक्टर- दैवशाला घुगे स्त्री रोग तज्ञ यांनी महिलाना आरोग्य बदल माहिती सांगून महिलांना सकस आहार घेवा असे सांगितले जेणकारून शरीरातील रक्त वाढेल अशक्तपणा येणार नाही . व महिलाना शारीरिक आजार काही निर्माण झाला तर लवकर डॉक्टरकडे जाण्यात यावे अंगावर आजार काढू नाही, दररोज गूळ शेंगदाणे खावे जेणेकरून रक्त वाढेल.
◾ गोदावरी कावरे योगा शिक्षिका यांनी महिलानी दररोज योगा करून शरीर तंदुरुस्ती ठेवावे अस सांगितले.
◾ स्वाती अष्टेकर म्हणाल्या, महिला बचत गट स्थापन करून सामाजिक काम पण केले पाहिजे. व शासनाच्या योजनेचा फायदा घेतला पाहिजे व ऑफिसला आले पाहिजे, बँकेला आले पाहिजे. असे सांगितले.
◾व्यवस्थापक मीना नेहरकर यांनी नगर परिषद परळी वैजनाथ अंतर्गत मागील काळात वैयक्तिक कर्ज वाटप केले आहे यातून स्वतचा रोजगार निर्माण करावा, बँकेचे कर्ज घेतले ते वेळवर फेडावे जेणकरून पुढील काळात आपली बँकेत पत निर्माण होईल असे सांगितले. बँकेतील विमा स्वतचा काढला पाहिजे जेणकरून भविष्यात काही घटना घडल्या तर बँकेतून लाभ मिळेल असे मार्गदर्शन केले.
भारतमाता शहर स्तर संघाचे अध्यक्षा अंबिका परदेशी यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे लाभार्थी यांचे आभार मानले. या कार्यक्रम यशस्वी करण्यास सी ऐल सी व्यवस्थापक खंडू डोने, आम्रपाली पैठणे, अरुणा जगताप,सुरेखा घोंगरे, सुनीता परळीकर, कविता कुंभार, संतोष स्वामी यांनी मदत केली, या वेळी शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.

