
🔺तापमान 🔺 उन्हाळा
अकोला-चंद्रपूर: या वेळी फेब्रुवारी च्या मध्या नंतर राज्यातील बहुतांश भागात वाढत असलेल्या उष्याने तगमग वाढली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत १६ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे. चंद्रपूर यवतमाळमध्ये पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेची तीव्रता कायम राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यातील विभाग निहाय तापमान पाहिलेतर विदर्भातील ब्रम्हपुरी, चंद्रपूर येथे कमाल तापमान आज शनिवारी ४१ अंश सेल्सियसवर पोहोचले. अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ येथील तापमानाचा पारा ३९ ते ४० अंशांवर राहिला.
मराठवाड्यात बीड,जालना, धाराशिव,हिंगोली, परभणीच्या काही भागात तपमानात वाढ झालेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १५ ते १६ मार्चदरम्यान झारखंड, पश्चिम बंगालचे गंगा क्षेत्र, छत्तीसगड, विदर्भ, उत्तर तेलंगणा आणि १८ ते १९ मार्चरम्यान उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणावर उष्म्यात वाढ होऊन उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

