
🔶 स्वयंसहायता बचत गट जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन
बीड दि. 20: बीड जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या वतीने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या वतीने दि. 20 मार्च ते 24 मार्च 2025 या कालावधीत जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 20 मार्च रोजी करण्यात आले.
जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन 2025 च्या या गुढीपाडवा महोत्सव, ईद बाजार आणि खाद्य जत्राचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती संगीतादेवी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत डॉ. ज्ञानोबा मोकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, शिक्षणाधिकारी (निरंतर) संजय पंचगल्ले यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारलेल्या 25 स्टॉलला सीईओ आदित्य जीवने यांचा सामान्य वाऱ्याने भेटी देऊन खाद्य संस्कृती खाद्य जत्रा व स्टॉलला भेट दिली. सदर विक्री व प्रदर्शनाची दररोज वेळ सकाळी 10.00 ते रात्री 11.00 वाजेपर्यंत आहे. बचतगट स्वयंसहायता समुहातील महिलांच्या प्रगतीचा, महा खरेदीचा उत्सव, महा मेजवानीचा, गुढीपाडवा महोत्सव, ईद बाजार व खाद्य जत्रा जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन 2025 मध्ये खास आकर्षण मसाले, खाद्यपदार्थ, हस्तकला, ग्रामीण कलाकुसर, ज्वेलरी तसेच शाकाहारी व मांसाहारी मेजवानी व खुप काही आयोजित करण्यात आलेले आहे. उमेद च्या जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व एकवेळ अवश्य भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील यांनी केले आहे.

