एम एन सी न्यूज नेटवर्क – बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची जिल्ह्यातील विविध विभागांना अचानकपणे भेटी देणं सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी परळी येथील उपजिल्हा रुग्णालयास सकाळी (दि.२३) सकाळी १० च्या सुमारास अचानक भेट देऊन उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेत विविध विभागाची पाहणी केली.
गुरुवारी दिनांक 23 परळी उपजिल्हा रुग्णालय त्यांनी अशीच अचानक भेट देऊन रुग्णालयाच्या विविध विभागाची पाहणी करत अनेक सूचना केल्या. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी, वार्ड, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभागासह प्रत्येक विभागाची यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी पाहणी केली.
दरम्यान जिल्हाधिकारी मॅडमनी स्वच्छते बाबत अधिक लक्ष द्या अश्या सुचना दिल्या. ब-याच दिवसापासुन सीबीसी तपासणी बाहेरून करावी लागत होती संबधित आरोग्य विभागाला लागलीच सुचना करुन सीबीसी सेल मशीन तात्काळ उपलब्ध करण्याबाबत सूचित केले
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिलेल्या भेटी वेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर सह पोलीस निरीक्षक सुरेश चाटे , तसेच आरोग्य विभागाचे डॉ. अरुण गुट्टे, डॉ दिनेश कुरमे, डॉ. नाथराव फड, डॉ. वैशाली गंजेवार, डॉ, तिडके, डॉ लोहिया आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.