शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’

🔷 कला विश्व🔺 शिल्प कला 🔷शिल्पकार

मुंबई : जगातील सर्वात मोठे सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ निर्माण करून जगात देशाची अस्मिता आणि भव्यदिव्य निर्माण करणारे राम सुतार यांना शिल्पकलेतील महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे या पुरस्कारचे स्वरूप आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १२ मार्च २०२५ रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत राम सुतार यांचे नाव २०२४ च्या पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले. राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्ष असून अजूनही ते शिल्प तयार करण्याचे काम करीत आहेत.

जगातील सर्वात उंच असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ निर्माण करून भव्यदिव्य शिल्पं साकारले आहे. आज जगातून पर्यटक स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहण्यासाठी भारताला भेट देत आहेत.