
🔷लोकन्यायालय
बीड दि. 22 ( जिमाका ):- येथील जिल्हा न्यायालयात आयोजित लोकन्यायालयामध्ये तडजोडी अखेरीस दोन अपघात मृत्यूतील व्यक्तीच्या वारसांना वारसांना एक कोटी 80 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली सोबतच इतरही प्रकरणी समेट घडवून आणण्यात आला
आज दिनांक 22 मार्च 2025 रोजी बीड जिल्हा न्यायालयामध्ये लोक न्यायालय संपन्न झाले. सदरील लोक न्यायालयामध्ये मोटार अपघात प्रकरण क्र. 426/2021 (शितल भगवान पवार व ईतर विरूद्ध शिवाजी व ईतर) या प्रकरणात मा. न्यायालयासमोर तडजोड झाली व सदरील तडजोडीनुसार अर्जदार यांना गैरअर्जदार क्र. 4 लिबर्टी जनरल इंन्शुरन्स कंपनी यांनी नुकसान भरपाईपोटी रक्कम रू.90,00,000/(अक्षरी नव्वद लाख रूपये) मंजुर केले. सदरील प्रकरणात तडजोड करणेकामी अर्जदार 1. शितल भगवान पवार, 2. खुशी भगवान पवार, 3. सावित्रीबाई भागवत पवार 4. भागवत रामु पवार व उक्कडपिंप्रीचे सरपंच गहिनीनाथ पालवे व अर्जदारांचे वकील अॅड. एम. आर. गर्जे, गैरअर्जदार क्र. 4 तर्फे कंपनीचे वतीने त्यांचे अधिकारी श्रद्धा किनारे मॅडम, आदित्य रायकर व कंपनीचे विधीज्ञ अॅड. आनंद दिलीप कुलकर्णी, अॅड. ए. पी. कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले. मयत भगवान भागवत पवार हे सैन्य दलामध्ये शासकीय नौकरीस असल्यामुळे गैरअर्जदार क्र. 4 यांनी सदर बाबीचा विचार करून सदरची नुकसान भरपाईची रक्कम मंजुर केली.
तसेच आज रोजीच्या न्यायालयामध्ये मोटार अपघात प्रकरण क्र. 246/2022 (अर्चना धोडरे व ईतर विरूद्ध मिर्झा बेग व ईतर) या प्रकरणात मा. न्यायालयासमोर तडजोड झाली व सदरील तडजोडीनुसार अर्जदार यांना गैरअर्जदार क्र. 4 राॅयल सुंदरम इंन्शुरन्स कंपनी यांनी नुकसान भरपाईपोटी रक्कम रू.96,00,000/(अक्षरी शहान्नव लाख रूपये) मंजुर केले. सदरील प्रकरणात तडजोड करणेकामी अर्जदारांचे वकील अॅड. सतीश गाडे व गैरअर्जदार क्र. 4 तर्फे कंपनीचे वतीने कंपनीचे विधीज्ञ अॅड. ए. पी. कुलकर्णी यांनी सहकार्य केले. मयत दिनेश प्रल्हादराव धोंडरे हे शासकीय नोकरीस असल्यामुळे गैरअर्जदार क्र. 4 यांनी सदर बाबीचा विचार करून सदरची नुकसान भरपाईची रक्कम मंजुर केली.
सदरील वरील दोन्ही प्रकरणातील तडजोड जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री यावलकर अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश पाटवदकर, जिल्हा विधी प्राधिकरण, बीड चे सचिव सोनी यांचे समक्ष करण्यात आली.
🔶 पुन्हा जुळल्या नात्यांच्या तारा
अनिल कुंडलीक गालफाडे व गिरीजा उर्फ पौर्णिमा अनिल गालफाडे यांचा विवाह दि. 31 मे 2001 रोजी चिंमोली माळी, ता.केज, जि. बीड हिंदु धर्म शास्त्राप्रमाणे झाला. लग्नानंतर काही दिवस त्यांचा संसार चांगला झाला. परंतु त्यानंतर त्यांच्यामध्ये वैयक्तीक मतभेद असल्याने किरकोळ कारणांवरून कारणावरून आपसामध्ये भांडण होवू लागले. गिरीजा ही अनिल याला सोडून माहेरी निघुन गेली. त्यांच्यातील आपसातील मतभेद वाढल्यामुळे त्यांनी घटस्फोटासाठी हिंदु विवाह अर्ज क्र. 194/2023 हा या न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला. प्रस्तुत प्रकरणातील कथने विचारात घेवून तडजोडीकरीता आज दि. 22/मार्च 2025 रोजी लोकन्यायालयात ठेवण्यात आले. लोकन्यायालयामध्ये पॅनल प्रमुख दिवाणी न्यायाधीश व. स्तर, अंबाजोगाई माणिक वाघ यांनी व पॅनल सदस्य म्हणून विधिज्ञ बाळासाहेब लाड यांनी काम पाहिले. अर्जदारातर्फे विधिज्ञ विषाल घोबाळे व हनुमंत राउत यांनी काम पाहिले.
दोन्ही पक्षकारांना आपली बाजु मांडण्यास संधी देवून दोघांचेही म्हणणे ऐकुन घेतले त्यांच्यातील वाद विकोपाला गेले असलेने त्यंाना विवाहाचे महत्व समजावुन सांगितले. अनिल हा बिग बास्केट कंपनीमध्ये नोकरीस आहे. तसेच गिरीजा हिचे तंत्रशिक्षण झालेले आहे. त्यांच्या भविष्याकरिता त्यांनी एकत्र राहणे किती महत्वाचे आहे हे त्यांना समजावून सांगितले. दोन्ही पक्षकारांना सामाजिक भान लक्षात ठेवून संसार करण्यासाठी मार्गदर्शन केले. लोकअदालत पॅनल प्रमुखांनी केलेले मार्गदर्शन त्यांनी मनःपुर्वक ऐकुन घेतले व विवाह संबंध सुधारण्यास त्यांनी चांगला प्रतिसाद दिला व त्यांनी एकमेकांसोबत राहुन सुखाचा संसार करण्याचे ठरविले.
प्रस्तुत प्रकरणात जिल्हा न्यायाधीश, अंबाजोगाई दिपक खोचे व संजश्री घरत यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर परेश वागडोळे यांचे अमुल्य सहकार्य लाभले. त्यांचे विधीज्ञ आणि वकील संघाचे सदस्य यांनीही पक्षकारांमध्ये तडजोड घडवून आणण्यास सहकार्य केले. उपस्थीत न्यायाधीश व वकील यांनी त्यांना पुढील सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या.
सर्वांच्या प्रयत्नाने व पक्षकारांच्या सहमतीमुळे एक मोडकळीस निघालेला संसार पुन्हा सुरळीत झाला.

