
🔶 समाज माध्यमावर पोस्ट करताना सावधानता बाळगा,पो.नि. रघुनाथ नाचणं
बीड-परळी-वैजनाथ- प्रतिनिधी-औरंगजेब संदर्भाने आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून दोन समाजात द्वेष भावना वाढवण्याच्या उद्देशाने 2 इसमाने इंस्टाग्राम वर सदरची पोस्ट व्हायरल करण्यात आली होती, सायबर पोलीस स्टेशन बीड येथे सोशल मीडियावर लक्ष ठेवून असल्याने ,सदरची पोस्ट दिसून आल्याने व तसेच सोशल मीडियावर सदर पोस्ट व्हायरल होत असल्याने , सायबर पोलीस स्टेशन कडील उपलब्ध व्हायरल पोस्टवरून पोलीस ठाणे परळी शहर येथे गोपनीय शाखेचे पो का.विष्णू फड , ब.नंबर 1010, यांच्या फिर्यादवरून गुरन 61/ 2025 कलम 353 ( 2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपापल्या अल्पवयीन मुलांच्या मोबाईलवर पालकांनी लक्ष ठेवावे. असे आवाहन परळी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण यांनी केले आहे.
सदरची पोस्ट समाज मध्यमावरून हटविण्यात आली आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस करत असून गुन्हातील वरील आरोपीता विरुद्ध तपास करून, कायदेशीर कारवाई करत आहेत. तरी समाज माध्यमावर चुकीच्या पोस्ट व्हायरल करताना, सामाजिक भावना लक्षात घेऊन संवेदनशील रहावे, विनाकारण पोस्ट व्हायरल करू नये, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी.

