वैद्यनाथ कारखान्याचे संचालक दत्ताभाऊ देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, ॲड.राजेश्वर चव्हाण यांची उपस्थिती

एम एन सी न्यूज नेटवर्क – भाजपचे नेते माजी नगरसेवक तथा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक,परळी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री.दत्ताभाऊ देशमुख यांनी आज माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री जयसिंगकाका गायकवाड, राष्ट्रवादी बीड जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर आबा चव्हाण, राष्ट्रवादीचे युवक नेते अजयजी मुंडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, परळी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दत्ताभाऊ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेशअण्णा टाक,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैजनाथ सोळंके,युवक तालुकाध्यक्ष गोविंद कराड,राष्ट्रवादी महिला काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष संगीताताई तुपसागर,महिला आघाडी शहराध्यक्षा सोफियाताई नंबरदार,युवती आघाडी शहराध्यक्षा वर्षाताई दहिफळे, तालुकाध्यक्षा शिल्पाताई मुंडे,रामेश्वर महाराज कोकाटे,अय्युब खान पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.