
🔷 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केली आकडेवारी
मुंबई- वृत्तसंस्था – सरलेल्या दहा वर्षात म्हणजे २०१५ ते २०२५ या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्न वाढीत म्हणजे जीडीपी वाढीत भारताने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कालावधीत करोना आणि व्यापार युद्धासारखे पेच प्रसंग निर्माण झाले असूनही इतर देशापेक्षा भारताने चांगली कामगिरी केल्याची आकडेवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जारी केली आहे. नाणेनिधीने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न २.१ लाख कोटी डॉलरवरून ४.३ लाख कोटी डॉलर झाले आहे.
म्हणजे या कालावधीत महागाईचा समावेश केला नाही तर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न १०५ टक्क्यांनी वाढले आहे.
तर मग महागाईच्या आकडेवारीचा विचार केल्यानंतर या कालावधीत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ७७ टक्क्यांनी वाढले आहे. दहा वर्षांत भारत पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थामध्ये ब्राझीलची खराब कामगिरी ब्राझीलचे राष्ट्रीय उत्पन्न या कालावधीत केवळ आठ टक्क्यांनी वाढून २.१ लाख कोटी डॉलर वरून २.३ लाख कोटी डॉलरवर गेले आहे.
त्याचबरोबर ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान या विकसित देशाचे राष्ट्रीय उत्पन्न या कालावधीत केवळ ६ ते १४ टक्क्यांनी वाढले आहे. म्हणजे भारताने राष्ट्रीय उत्पन्न वाढीत सर्वात चांगली कामगिरी केली आहे. सामील झाला आहे. २०२५ मध्ये भारत जपानला तर २०२७ मध्ये जर्मनीला मागे टाकून मोठी तिसरी अर्थव्यवस्था होणार आहे. चीन दुसऱ्या क्रमांकावर दहा वर्षांमध्ये चीनची अर्थव्यवस्था ७४ टक्क्यांनी वाढून ११.२ लाख कोटी डॉलरवरून १९.५ लाख कोटी डॉलरची झाली. अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न २३.७ लाख कोटी डॉलरवरून ३०. ३ लाख कोटी डॉलरवर गेले आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न केवळ २८ टक्क्यांनी वाढले आहे.

