ना. संजय शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार हिंदूधर्मीय सामूहिक सोहळा

🔶सामूहिक विवाह सोहळा

🔶नेत्र दिपक विवाह सोहळ्याचे साक्षीदार व्हा : व्यंकटेश शिंदे

बीड परळी वैजनाथ (एम एन सी न्यूज नेटवर्क): शिवसेना आयोजित हिंदु धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, छत्रपती संभाजी नगर चे पालक मंत्री तथा शिवसेनेचे प्रवक्ते ना. संजयजी सिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होणार आहे. गरजवंत कुटुंबातील वधू वरांच्या नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अन् शुभाशिर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन शिवसेना आयोजित हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजक तथा शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केले आहे.

शिवसेनेच्या वतीने प्रती वर्षी हिंदु धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. परळी तालुक्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, ऊसतोड मजूर अशा गरजवंत कुटुंबातील मुलींचे सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून कन्यादान करण्याचे पवित्र कार्य शिवसेनेच्या वतीने करण्यात येते. दिनांक २ एप्रिल बुधवार रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता शिवशाहीर साईनाथ पाटील यांचा शिवचरित्रावर प्रकाश झोत टाकणारा पोवाडा सादर करण्यात येईल अन् ठीक ६ वाजता मोंढा मैदान मारोती मंदिर समोर दिमाखदार विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी परळी तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी तथा मान्यवर, व्यापारीवर्ग, विविध सामाजिक क्षेत्रातील तसेच चळवळीतील विचारवंत, पत्रकार बांधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी परळी शहरातील नागरिकांनी या नेत्रदीपक सोहळ्यास उपस्थित राहून वधू वरांना शुभाशिर्वाद देऊन नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन विवाह सोहळ्याचे प्रमुख आयोजक तथा शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केले आहे.