🔶 स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेचा मजबूत वार्षिक ताळेबंद: 123 कोटी 95 लाख अर्थिक उलाढाल तर 78 लाख 66 हजार निव्वळ नफा
बीड परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क- शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे.स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक वाटचाल मजबूत व प्रगतीपथावर आहे. सरत्या अर्थिक वर्षात संस्थेने 123 कोटी 95 लाख अर्थिक उलाढाल तर 78 लाख 66 हजार निव्वळ नफा कमावला आहे.ग्राहक व ठेवीदारांच्या विश्वासावरच ही वाटचाल सुरु असल्याचे चेअरमन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले.
स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेची 31 मार्च २2025अखेरचा ताळेबंद सादर करण्यात आला आहे. संस्थेची अर्थिकस्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विषेश म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी-ठेवी 41 कोटी 05 लाख , राखीव निधी – 7 कोटी 47लाख,भागभांडवल-67 लाख 42 हजार , खेळते भांडवल-50 कोटी 15 लाख, कर्ज- 36 कोटी 06 लाख ,गुंतवणूक 12 कोटी 51 लाख, निव्वळ नफा 78 लाख 66 हजार इतका आहे.तर संस्थेची अर्थिक उलाढाल-123 कोटी 95 लाख आहे.सीडी रेशो 68.62% इतका आहे.
पतसंस्थेच्या या प्रगतीशील वाटचालीत सर्व खातेदार, ठेवीदार,कर्जदार, हितचिंतक यांचा विश्वास हेच पाठबळ आहे असे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले. पतसंस्थेचे उपाध्यक्ष अनिल आष्टेकर,सचिव जितेंद्र नव्हाडे , कोषाध्यक्ष रवि वळसे, संचालक श्रीकांत मांडे,राजाभाऊ मराठे, रवि मुळे, दशरथ होळकर, डॉ.सौ.श्रध्दा देशपांडे, सौ.पद्मश्री धर्माधिकारी यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक किरण सावजी यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद, नित्यसंचय ठेव प्रतिनीधी यांच्या मेहनतीत व सर्व सभासद ,ठेवीदार, कर्जदार, खातेदार व हितचिंतकांच्या पाठबळावर संस्थेची ही वाटचाल सुरु आहे.

